BMC Mediclaim Policy
मुंबई महानगरपालिका
वैद्यकीय गट विमा योजना
म.न.पा वैद्यकीय गट विमा अंतर्गत मे.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मेडिकल कार्ड डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करावे. 👇
वरील इमेज मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर :-
1) आपला 'Employee Id' टाकावे तद्नंतर
2) कंपनी या कॉलम मध्ये
'Brihanmunbai Municipal Corporation' असे लिहावे.
3) कर्मचाऱ्याची अचूक जन्म दिनांक टाकून, Find Your Health Card या बटणावर क्लिक करावे, आपल्याला सर्व कुटुंबाची माहिती दिसेल.
4) त्यातील तुम्हाला ज्यांचे ई कार्ड डाऊनलोड करायचे असेल त्या बटनाला क्लिक करावे.
5) त्या नंतर 'Beneficiary DOB' नावाची नवीन स्क्रीन येईल त्यात त्यांची जन्मतारीख टाकावी व 'verify' वर क्लिक करावे.
6) Verified Successfully असा मेसेज येईल व त्या खाली Download ecard वर क्लिक करावे
आपण आपले मेडिकल कार्ड डाऊनलोड करून जतन करुन ठेवावे.आपल्या पॉलिसी, नावामध्ये काही फरक असेल तरी bmcmediclaim@mediassist.in
वरती मेल पाठवा.
सूचना :- मोबाईलवर सदर Site ओपन करताना Chrome Browser मध्ये साईडला असणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करून Desktop Site ला क्लिक करावे.
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
यामध्ये आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याचे ई कार्ड उपलब्ध नसेल अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या आस्थापना विभागात अधिकृत कागदपत्रे सादर करावीत. तसेच आस्थापना विभागाने करावयाची कार्यवाही खालील प्रमाणे.
१) कर्मचाऱ्याचे नाव :
२) कर्मचारी संकेतांक :
३) पदनाम :
४) संवर्ग :
५) खाते/विभागाचे नाव :
६) कुटुंबातील सदस्याचे नाव :
७) नाते :
८) लिंग :
९) जन्म दिनांक :
१०) समाविष्ट कारण व दिनांक :
इत्यादी माहिती SAP प्रणाली मध्ये अद्ययावत करून हार्ड कॉपी प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय गट विमा योजना विभागास खाते प्रमुखांच्या सही शिक्यासह पाठवण्यात यावी. तसेच सॉफ्ट कॉपी Excel Sheet adminofficer01mis.chpo@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर पाठविण्यात यावी.
मुंबई महानगरपालिका वैद्यकीय गट विमा परिपत्रक, हॉस्पिटल यादी इत्यादी माहिती खाली दिलेल्या टेबलात उपलब्ध आहे..