निवडणूक कर्तव्ये व जबाबदारी

निवडणुक विशेष Forms & Formats
Forms & Formats
Download Link
Election Work in Urdu
PRO Diary
Format VM-3
Form No-7 
Form No-8
Form No-9


💥मतदान अधिकारी कर्त्यव्य:💥

💥 मतदान केंद्राध्यक्ष:-
* पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.

* कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.

* आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.

* सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे आणि सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

* माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.

* सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.

* मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.


EVM सीलिंग व्हिडीओ डाउनलोड करण्या साठी Download बटनावर किलिक करा.


 Download .      (Video Size 4.9 MB)

💥 मतदान अधिकारी:- १

*नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.

* ओळख पटवीणे.

* मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.

💥 मतदान अधिकारी:- २

* मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.

* डाव्या हाताच्या तर्जनीवर नखाजवळ पक्की शाई लावणे. 

* मतदार चिठ्ठी तयार करणे.

💥 मतदान अधिकारी:- ३ 

* पक्की शाई तपासणे.

* मतदार चिठ्ठी जमा करणे.

* कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.


💥 शिपाई:- 

मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.etc
***************************


💥 महत्वाचे फॉर्म्स:-


(1) हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:

    1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.

    2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.

     3) केंद्राध्यक्ष दैनंदिनी.

     4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.

     5) PSO 5 फॉर्म (voter turnout report for polling station)

     6) व्हिजिट शीट (भेट अहवाल)


(2) संविधानिक पाकिटे सिल :(हिरव्या रंगाचे)

      1) मतदार यादीची चिन्हांकित प्रत.

      2) मतदार नोंद वही.

      3) व्होटर स्लिप.

      4) वापरलेल्या दुबार मतपत्रिका व नमूना 17 बी.

      5) न वापरलेल्या मत पत्रिका.


(3) असांविधानिक पाकिटे:(पिवळया रंगाचे)

      1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
  
      2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.

      3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.

      4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.

      5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.

      6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.

      7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.

      8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.


(4) इतर साहित्याचे पाकिटे: (खाकी रंगाचे)

इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.


💥प्राँक्सी मतदान:-

  सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.


💥प्रदत्त मते:-

   एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

  📱टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........📱

  राष्ट्रीय कर्त्यव्यात सहभागी सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गास शुभेच्छा